शहरात थंडी कायम असून, सलग दुसऱ्या दिवशी १० अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. त्यामुळे नाशिककर गारठले असून, दैनंदिन कामकाजावर परिणाम जाणवत आहे.
गेल्या आठवड्यात नाशिकमध्ये १४ ते १५ अंश सेल्सिअस किमान तापमान होते. शुक्रवारी (दि. २०) त्यात अचानक ५ अंशांनी घट झाल्याने गारठा वाढला. कमाल तापमानही ३० अंशांखाली आले आहे. यंदा अल निनो वातावरणीय स्थितीमुळे थंडी कमी राहण्याचा अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात उशिरा थंडी पडण्यास सुरुवात झाली आहे. जिल्ह्यात पुढील आठवडाभर थंडी कायम राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, थंडीत अचानक वाढ झाल्याने उबदार कपड्यांच्या दुकानांत गर्दी होत आहे.