सातारा : मरळी (ता. पाटण) येथे आयोजित कोयना-दौलत डोंगरी महोत्सव हा लोकांना विविध ठिकाणच्या संस्कृतींची अनुभूती देण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. यानिमित्ताने या परिसरातील नागरिकांना जागतिक दर्जाच्या पर्यटन सुविधांचाही अनुभव घेता येणार आहे, असे प्रतिपादन पर्यटन मंत्री तथा पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी केले.
कोयना-दौलत डोगरी महोत्सवाचे उद् घाटन पाटण तालुक्यातील नाडे येथे पालकमंत्री देसाई यांच्या हस्ते झाले. या वेळी जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशानी नागराजन, प्रभारी जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर, पंचायत समिती सभापती सरिता पवार, उपसभापती विजय पवार, विजयादेवी देसाई, लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष यशराज देसाई, मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रवीराज देसाई, प्रांताधिकारी सोपान टोणपे, तहसीलदार अनंत गुरव आदी उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी मर्दानी खेळांचे सादरीकरणही केले. या वेळी परिसरातील नागरिक उपस्थित होते.


