काबूल : उत्तर अफगाणिस्तानात शुक्रवारी रात्री झालेल्या ५.८ रिश्टर स्केल तीव्रतेच्या शक्तिशाली भूकंपात १२ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये काबूलच्या बाहेरील भागात राहणाऱ्या एकाच निर्वासित कुटुंबातील आठ सदस्यांचा समावेश असून, हे कुटुंब अवघ्या १५ दिवसांपूर्वीच इराणमधून मायदेशी परतले होते.
५० वर्षीय नजीबुल्ला, त्यांचे कुटुंब अफगाणिस्तानात परतले होते. ते एका भिंतीला लागून तंबूत राहत होते. या दुर्घटनेत नजीबुल्ला, त्यांची पत्नी, चार मुली (वय १२ ते २३) आणि दोन मुलांचा जागीच मृत्यू झाला.


