सहारा विश्वचषक गॅलरीतील अविस्मरणीय ठेव्यांवर हातोडा

महाराष्ट्र टाइम्स

मुंबईतील सहारा गॅलरी आता पाडण्यात येत आहे. २०११ च्या विश्वचषक विजयाच्या आठवणी जतन करण्यासाठी ही गॅलरी उभारली होती. मात्र, प्रेक्षकांनी फारसा प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे मुंबई महापालिकेला ही गॅलरी सांभाळणे शक्य झाले नाही. आता या जागेवर टेबल टेनिससारख्या खेळांना प्राधान्य दिले जाणार आहे. गॅलरीतील वस्तूंचे काय होणार याबद्दल माहिती देण्यात आली आहे.

2011 cricket world cup victory demise of sahara gallery

भारतीय क्रिकेट संघाने २०११मध्ये जिंकलेल्या विश्वचषकाच्या अविस्मरणीय घटनांचा ठेवा जतन करून ठेवण्यासाठी १४ वर्षांपूर्वी अंधेरीतील महापालिकेच्या शहाजीराजे भोसले क्रीडा संकुलात सहारा गॅलरी उभारण्यात आली. मात्र, प्रेक्षकांच्या अल्प प्रतिसादाअभावी गॅलरीचा डोलारा सांभाळणे मुंबई महापालिकेला अशक्य झाले. आता ही गॅलरी पाडण्यात येत असून, महापालिकेने टेबल टेनिससारख्या नव्या खेळाला प्राधान्य देत एका संस्थेसोबत करार केला आहे.

सन २०११मधील विश्वचषक विजयाच्या आठवणी जपण्यासाठी क्रिकेट गॅलरी उभारण्याचा ठराव एप्रिल २०११मध्ये मुंबई महापालिका क्रीडा आणि ललित प्रतिष्ठानच्या विश्वस्त मंडळाच्या सभेत संमत करण्यात आला. या एसी गॅलरीत विश्वचषक विजेत्या संघातील खेळाडूंची छायाचित्रे, क्रिकेट संबंधित साहित्य, सचिन तेंडुलकरसह एम. एस. धोनी तसेच सुनील गावस्कर, कपिल देव अशा काही खेळाडूंचे मेणाचे पुतळे यांचा समावेश करण्यात आला. जानेवारी २०१२मध्ये तत्कालीन महापौर श्रद्धा जाधव, तत्कालीन उपमहापौर शैलजा गिरकर, त्यावेळचे महापालिका आयुक्त सुबोध कुमार, ज्येष्ठ क्रिकेटपटू आणि पद्मभूषण सुनील गावस्कर, शिवसेना (उबाठा) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आदींच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. सुरुवातीला काही वर्षे मिळालेला (पान ४वर)