‘चढ्ढांनी हटविल्या टीकेच्या पोस्ट’

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

आम आदमी पक्षाचे खासदार राघव चढ्ढा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षावर केलेल्या टीकेच्या पोस्ट हटविल्या आहेत. पक्षाचे दिल्ली अध्यक्ष सौरभ भारद्वाज यांनी हा दावा केला आहे. चढ्ढा यांनी पक्षांतर्गत टीकेचा निषेध करत आपले राज्याशी असलेले संबंध अधोरेखित केले. संसदेत नागरिकांचे प्रश्न मांडण्यासाठी आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मोदी आणि भाजपवर टीका केल्याने चढ्ढा यांना उपनेतेपदावरून हटविण्यात आले.

aap mp raghav chadha deletes posts criticizing modi

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षावर टीका करणाऱ्या पोस्ट ‘ आप ’चे खासदार राघव चड्ढा यांनी हटविल्या आहेत, असा दावा ‘आप’चे दिल्ली अध्यक्ष सौरभ भारद्वाज यांनी रविवारी केला. ‘आप’च्या नेत्यांनी ‘शेअर’ केलेल्या पोस्टही चढ्ढा यांच्या अकाउंटवरून गायब झाल्याचा दावाही त्यांनी केला.

दरम्यान एक्सवर व्हिडिओ शेअर करताना चड्ढा यांनी पक्षांतर्गत टीकेचा निषेध केला आणि राज्याशी आपले संबंध अधोरेखित केले. नागरिकांचे प्रश्न उपस्थित करण्यासाठी संसदेत आलो, गोंधळ घालण्यासाठी नाही, अशी भूमिकाही मांडली. मोदी, भाजपवर टीका केल्याने ‘आप’ने चड्ढा यांना उपनेतेपदावरून हटविले.