राज्य खो-खो संघटनेचीसूत्रे सुनेत्रा पवारांकडे

महाराष्ट्र टाइम्स

महाराष्ट्र राज्य खो-खो संघटनेच्या अध्यक्षपदी सुनेत्रा पवार यांची बिनविरोध निवड झाली. त्या या पदावर निवडल्या गेलेल्या पहिल्या महिला ठरल्या आहेत. म्हाळुंगे बालेवाडी येथे झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत हा निर्णय घेण्यात आला. अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या पदावर त्यांची निवड झाली. खो-खो इंडिया आणि खो-खो महाराष्ट्र या समांतर संघटनांमधील खेळाडूंवर कारवाईऐवजी संघटक आणि प्रशिक्षकांवर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

sunetra pawar elected unopposed as the president of the kho kho association

महाराष्ट्र राज्य खो-खो संघटनेच्या अध्यक्षपदी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली. खो-खो राज्य संघटनेचे अध्यक्षपद भूषविणाऱ्या सुनेत्रा पवार पहिल्या महिला ठरल्या.

म्हाळुंगे बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात रविवारी विशेष सर्वसाधारण सभा झाली. अजित पवार यांच्या दुर्दैवी मृत्यूनंतर रिक्त झालेल्या अध्यक्षपदी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची बिनविरोध निवड करण्याचा ऐतिहासिक निर्णय झाला. या बैठकीसाठी भारतीय खो-खो महासंघाचे उपाध्यक्ष लोकेश्वरा आणि महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे प्रदीप खांडरे निरीक्षक म्हणून उपस्थित होते. बैठकीला सर्व जिल्हा प्रतिनिधींची उपस्थिती होती. यापूर्वी हॉकी आणि रायफल संघटनांमध्ये महिला अध्यक्ष होत्या.

दरम्यान, खो-खो इंडिया आणि खो-खो महाराष्ट्र या समांतर संघटनांच्या स्पर्धेत खेळणाऱ्या खेळाडूंवर कारवाई करण्याऐवजी त्यांना या स्पर्धेसाठी नेणाऱ्या संघटक; तसेच प्रशिक्षकांवर कारवाई करण्याचा निर्णय राज्य संघटनेने रविवारी घेतला. त्या संदर्भात संलग्न जिल्हा संघटनांना कारवाई करण्याची सूचना दिली असून, त्याचा अहवाल १५ दिवसांत सादर करण्यास सांगितले असल्याची माहिती राज्य संघटनेचे पदाधिकारी डॉ. चंद्रजित जाधव यांनी ‘मटा’ला दिली.