अर्जुन, आदित्य,प्रांशुलचे विजय

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

पुण्यात पीएमडीटीए मानांकन ब्राँझ सीरीज टेनिस स्पर्धेत अर्जुन कोगेकर, आदित्य उपाध्याय आणि प्रांशुल पुजारी यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात केली. १२ वर्षांखालील मुलांच्या गटात आदित्य उपाध्याय, अर्जुन बेंद्रे, अर्जुन कोगेकर आणि प्रांशुल पुजारी यांनी विजय मिळवले. मुलींच्या गटात अदिरा भगत, इरा जोशी, मनल शेख, रितिशा नेहे, त्रिशा राजपूत आणि हृदवी लिमकरने यश मिळवले. समायरा चौधरी उपांत्यपूर्व फेरीत पोहोचली.

arjun aditiya and pranshuls tennis victories shine

पुणे : अर्जुन कोगेकर , आदित्य उपाध्याय , प्रांशुल पुजारी यांनी पीएमडीटीए मानांकन ब्राँझ सीरीज टेनिस स्पर्धेत आपापल्या प्रतिस्पर्ध्यावर मात केली. पाषाण येथे ही स्पर्धा सुरू आहे.

स्पर्धेतील १२ वर्षांखालील मुलांच्या गटात आदित्य उपाध्यायने विहान देवधरेवर ६-२ असा, अर्जुन बेंद्रेने कुमार कार्तिकेयवर ६-१ असा, अर्जुन कोगेकरने कियान पेंडुरकरवर ६-० असा, तर प्राशुंल पुजारीने रिदित नवलेवर ६-४ असा विजय मिळवला. यानंतर मुलींच्या गटात अदिरा भगतने ध्रुविका हर्षवर्धनला ६-० असे, इरा जोशीने यशवी मल्होत्राला ६-१ असे, मनल शेखने अद्विका सिंगला ६-२ असे नमवले. यानंतर रितिशा नेहेने अनघा कदववर ६-२ अशी, त्रिशा राजपूतने श्रगवी देशपांडेवर ६-१ अशी, हृदवी लिमकरने तिथी सोनटकेवर ६-२ अशी मात केली.

समायरा चौधरीने देवहुती चौहानवर ६-२ असा विजय मिळवून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.