वैशालीचा सलग दुसरा विजय

Contributed byम. टा. विशेष क्रीडा प्रतिनिधी|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

आर. वैशालीने कँडिडेट्स बुद्धिबळ स्पर्धेत सलग दुसरा विजय मिळवला. तिने तॅन झाँगयीला पराभूत केले आणि आता ती चार गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. वैशालीचा भाऊ आर. प्रज्ञानंदने फॅबिआनो कॅरुआनाविरुद्धची लढत बरोबरीत सोडवली. दोघांनी चालींची पुनरावृत्ती करत गुण वाटून घेतले. वैशालीने मिळवलेल्या विजयामुळे तिची विजेतेपदाची आशा वाढली आहे.

r vaishali secures her second consecutive victory in chess

आर. वैशालीने कँडिडेट्स बुद्धिबळ विजेतेपदाच्या आशा रविवारी उंचावल्या. तिने स्पर्धेतील सातव्या फेरीतील विजयासह आघाडीवरील स्पर्धकांत स्थान मिळवले. ती आता चार गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. दरम्यान, वैशालीचा भाऊ आर. प्रज्ञानंदला (प्राग) बरोबरीवर समाधान मानावे लागले.

वैशालीने सलग दुसरा विजय मिळवताना तॅन झाँगयीला पराभूत करण्यात यश मिळवले. खरे तर हा डाव सुरुवातीपासून डावाच्या मध्यापर्यंत बरोबरीत होता. मात्र, तॅनने ३७व्या चालीत हत्तीची सदोष खेळी केली. त्याचा पुरेपूर फायदा घेताना वैशालीने हुशारीने चाली करून पटावर वर्चस्व मिळवले. तिने तॅनचा काळ्या घरातील उंट हत्तीच्या मदतीने जिंकला. त्यानंतर तॅनने बरोबरीसाठी केलेले सर्व प्रयत्न विफल ठरले. वैशालीने राजा आणि काळ्या घरातील उंटाच्या मदतीने तॅनच्या राजाला कोंडीत पकडले. ‘तॅनची सदोष खेळी पाहून मला काहीसा धक्का बसला. खरे सांगायचे, तर काय करावे हेच मला सुचेना. काही वेळात सावरले. आता आपण जिंकणार याची खात्री पटली. अर्थात, मला तिच्याबद्दल नक्कीच वाईट वाटत आहे,’ अशी प्रतिक्रिया वैशालीने व्यक्त केली.

वैशालीचा सलग दुसरा विजय

वैशालीचा सलग दुसरा विजय

प्रज्ञानंदने कडव्या संघर्षानंतर फॅबिआनो कॅरुआनाविरुद्धची लढत बरोबरीत सोडवली. प्रागने ३०व्या चालीत हत्तींची अदलाबदल करण्यास कॅरुआनास भाग पाडले आणि त्यानंतर शह दिला. दोघांना चालींची पुनरावृत्ती करीत ३८ चालींनंतर गुण वाटून घेण्याचे ठरवले.