कृषी पुरस्कारांच्याअर्जांसाठी मुदतवाढ

महाराष्ट्र टाइम्स

राज्य सरकारच्या कृषी विभागाने २०२५ च्या राज्यस्तरीय कृषी पुरस्कारांसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत १५ एप्रिलपर्यंत वाढवली आहे. ही मुदतवाढ ३१ मार्च रोजी संपणार होती. शेतकरी, संस्था आणि कृषी विस्तारकांना विविध पुरस्काराने सन्मानित केले जाते. या प्रक्रियेला आता १५ दिवसांची अतिरिक्त मुदत मिळाली आहे. इच्छुक उमेदवार maharashtra.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करू शकतात.

deadline extended for agricultural awards applications to april 15

राज्य सरकारच्या कृषी विभागामार्फत २०२५ च्या राज्यस्तरीय विविध कृषी पुरस्कारांसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत १५ एप्रिलपर्यंत वाढवण्यात आली आहे. ही मुदत ३१ मार्च रोजी संपणार होती.

कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी , संस्था आणि कृषी विस्तारकांना डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न, वसंतराव नाईक कृषिभूषण, जिजामाता कृषिभूषण, वसंतराव नाईक शेतीमित्र, वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी, उद्यानपंडित पुरस्कार, कृषिभूषण (सेंद्रिय शेती), युवा शेतकरी पुरस्कार तसेच कृषी विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवारत्न पुरस्कारांनी गौरविले जाते. कृषी विभागाने अर्ज प्रक्रियेला १५ दिवसांची मुदतवाढ दिली आहे. कृषी विभागाच्या https://krishi. maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ‘ कृषी पुरस्कार ’ या विभागात प्रस्ताव सादर करता येतील.