इराणने लक्ष्य केलेल्या अमेरिकी लढाऊ विमानाच्या वैमानिकाची थरारक सुटका करण्यात आली. विमान पाडण्यात आल्यानंतर हा वैमानिक शत्रूपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी डोंगरातील एका खडकाच्या फटीत लपून बसला होता. नंतर त्याने डोंगरावर तब्बल सात हजार फुटांपर्यंत चढाई केल्याचे ‘न्यूयॉर्क टाइम्स’ने म्हटले आहे. इराणने या वैमानिकाला पकडण्यासाठी इनाम जाहीर केले होते.
या वैमानिकाच्या बचावकार्यात सर्वांनी दाखवलेले शौर्य आणि कौशल्याचे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रविवारी कौतुक केले. ‘‘एफ-१५’च्या गंभीर जखमी झालेल्या शूर वैमानिकाची इराणच्या डोंगरांमधून सुटका करण्यात आली. इराणी सैन्य मोठ्या संख्येने कसोशीने त्याचा शोध घेत होते आणि जवळ येत होते’, असे ट्रम्प यांनी ट्रुथ सोशलवरील पोस्टमध्ये म्हटले आहे. सुटका करण्यात आलेल्या वैमानिकाचा त्यांनी ‘अत्यंत प्रतिष्ठित कर्नल’ असा (पान ४वर)

