साक्ष दिल्यावरुन फायटरने मारहाण

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

छत्रपती संभाजीनगरमध्ये एका गुन्ह्यात साक्ष दिल्याने एका ५१ वर्षीय व्यक्तीला मारहाण करण्यात आली. दीपक नवनाथ भिसे आणि त्याच्या तीन साथीदारांनी मिळून कचरु नाना सरोदे यांच्यावर हल्ला केला. लाकडी दांडा, फायटर आणि धारदार शस्त्राने वार करून त्यांना जखमी केले. सातारा परिसरात ही घटना घडली. पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

fighter attacks witness 51 year old seriously injured

छत्रपती संभाजीनगर : एका गुन्ह्यात साक्ष दिल्याचा कारणावरुन चौघांनी एका ५१ वर्षीय व्यक्तीवर हल्ला करून त्याला लाकडी दांडा, फायटर व धारदार शस्त्राने वार करून जखमी केले. ही घटना ३१ मार्च रोजी रात्री सातारा परिसरात घडली. मारहाण करणाऱ्याचे नाव दीपक नवनाथ भिसे (रा. आहिल्याबाई चौक, चिकलठाणा) व त्याचे तीन साथीदार असे आहे.

या प्रकरणात कचरु नाना सरोदे (वय ५१, रा. महुनगर, बीड बायपास, सातारा परिसर) यांनी तक्रार दिली. सरोदे हे घरी जात असताना भिसेसह त्याच्या तीन साथीदारांनी त्यांना अडवले. हिराबाई सुनील बनसोडे यांच्या प्रकरणात सरोदे हे साक्षीदार झाल्या कारणाने, भिसे व अन्य तीन जणांनी सरोदे यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. भिसे व अन्य तिघांनी लाकडी दांडा, फायटर तसेच धारदार शस्त्राचा वापर करून मारहाण केली. या घटनेत सरोदे हे गंभीर जखमी झाले. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक रामकृष्ण काळे हे करीत आहेत.