खातातील वाढत जाणारा युद्धज्वर, विस्कळित झालेली पुरवठासाखळी आणि वाढत जाणारे कच्च्या तेलाचे भाव याचा जागतिक अर्थकारणावर परिणाम झाल्याचे हळूहळू दिसून येत आहे. त्यात अणुहल्ल्याची धमकी देणारे अमेरिकेचे अध्यक्ष, यामुळे एकंदरीतच अर्थविश्व आणि सगळेच शेअर बाजार अस्वस्थ आहेत. या सर्वांत लक्ष देण्यासारखे म्हणजे आपल्या शेअर बाजाराने मात्र गेले दोन दिवस जी हालचाल दाखवली, ती मात्र परिपक्व होती असे दिसून येत आहे. या सर्व घटनांची दखल घेऊन मुंबई व राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक शुक्रवारी अनुक्रमे ७३,३१९(+१८५) व २२,७१३(+३३) असा सकारात्मक पातळीवर बंद झाला.
सन २००८ आणि सन २०२० नंतर बऱ्याच दिवसांनी एवढे मोठे करेक्शन बाजारात दिसून आले आहे. या सर्वच गोष्टींकडे नवीन आणि पारंपरिक गुंतवणूकदारांनी आता वेगळ्या दृष्टीने बघितले पाहिजे असे वाटते. त्यातील घडलेल्या गोष्टींकडे कसे बघावे याचे काही मुद्दे -
बाजारातील करेक्शन हे नैमित्तिक आहे, की मागील काळात जे अपेक्षिलेले होते तसे आहे
ही फक्त निर्देशांकातील घसरण आहे, की समभागातील वाढीव किमतीतील घसरण आहे
बाजारातील पडझडीला जागतिक की देशांतर्गत कारणं निमित्त ठरत आहेत
देशातील व्यवसाय आणि नफा यातील मार्जिनवर जागतिक अस्थिरतेचा परिणाम झाला आहे का
आपली बाहेरील देशातील मागणी /पुरवठा घटला आहे की स्थिर आहे
देशातील अर्थव्यवहार मार्गदर्शक तत्वानुसार नीट चालू आहे की नाही
देशांतर्गत बँकिंग प्रणाली विस्कळीत झालेला नाही ना
वरील गोष्टीवरून गुंतवणूकदारांना एवढा, तरी नक्की अंदाज येईल, की बाजारात किंवा तत्सम पर्यायांत गुंतवणूक करताना काय बघितले गेले पाहिजे. अशा काळात जर आपण नियमित येणाऱ्या करेक्शनचक्रात असू, तर घाबरण्याचे काही कारण नाही. त्या अनुषंगाने जे समभाग चांगले किमतींत दिसून येत आहेत ते देत आहे. (तक्ता पाहा.) आपल्या सल्लागाराची मदत घेऊन त्यांत गुंतवणूक करावी.
तक्त्यात दिलेले समभाग खरेदी करताना सध्या घाई करू नये. बाजाराचा कल आणि सध्याच्या जागतिक घटना यावर लक्ष ठेवून गुंतवणुकीचा निर्णय घ्यावा. बाजार उघडेल तेव्हा सर्वप्रथम बाजाराला स्थिर होऊन दिशा धरू द्यावी. मागील दोन दिवसांच्या हालचालींवरून बाजाराचा किमान पातळी स्तर आता बनला आहे, असं तूर्तास वाटत आहे. सध्यातरी शॉर्ट टर्म नफेखोर राहा.



