एअर इंडियाची तिकिटे महागणार

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

एअर इंडिया समूहाने तिकिटांच्या किमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. आठ एप्रिलपासून देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर इंधन अधिभार लागू होईल. देशांतर्गत प्रवासासाठी २९९ ते ८९९ रुपये तर आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी २४ ते २८० डॉलर अधिभार आकारला जाईल. काही मार्गांसाठी अधिभार नंतर जाहीर केला जाईल. यामुळे प्रवाशांना आता जास्त पैसे मोजावे लागतील.

air india ticket prices set to rise increase expected with fuel surcharge

मुंबई : देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर आठ एप्रिलपासून इंधन अधिभार आकारला जाणार आहे, असे एअर इंडिया समूहाने मंगळवारी जाहीर केले. यामुळे तिकिटांच्या किमतीत वाढ होणार आहे.

देशांतर्गत उड्डाणांवर हा अधिभार २९९ ते ८९९ रुपये असेल, तर आंतरराष्ट्रीय मार्गांवर २४ डॉलर (सुमारे २,२०० रुपये) ते २८० डॉलर (सुमारे २५ हजार रुपये) अधिभार आकारला जाईल. काही मार्गांसाठी अधिभार नंतर जाहीर होणार आहे.