अबुधाबी : इराणमधील संघर्षामुळे निर्माण झालेल्या जागतिक तेल पुरवठ्याच्या तीव्र आणि प्रदीर्घ व्यत्ययामुळे ‘संयुक्त अरब अमिराती’ने ( यूएई ) तेल उत्पादक देशांची प्रमुख संघटना असणाऱ्या ‘ ओपेक ’मधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या १ मेपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे.
‘यूएई’तर्फे मंगळवारी घेण्यात आलेला हा निर्णय तेल उत्पादक देशांच्या युतीसाठी आणि त्यांचा अघोषित नेता सौदी अरेबियासाठी एक मोठा धक्का मानला जात आहे.






