बस-ट्रकच्या धडकेत एकाचा मृत्यू

महाराष्ट्र टाइम्स

हुडकेश्वर हद्दीत आऊटर रिंग रोडवर पहाटे भीषण अपघात झाला. भरधाव ट्रॅव्हल्स बसने ट्रकला धडक दिली. या अपघातात बस चालकाचा जागीच मृत्यू झाला. बसमधील आठ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. हा अपघात जबलपूर हायवेवर घडला.

bus truck accident in hudkeshwar driver dies eight passengers injured

हुडकेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीत आऊटर रिंग रोडवर भरधाव ट्रॅव्हल्स बसने ट्रकला धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात ट्रॅव्हल्स चालकाचा जागीच मृत्यू झाला असून आठ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.

ही घटना मंगळवारी पहाटे ५.३० वाजताच्या सुमारास जबलपूर हायवेवरील हिंदुस्थान सावजी ढाब्यासमोर घडली. ट्रॅव्हल्स बसचा चालक मोहम्मद इमरान (वय ३७, रा. तेलंगणा) याने निष्काळजीपणे वाहन चालवित ट्रकला मागून धडक दिली. यात अपघातात इमरानचा मृत्यू झाला. तर बसमधील आठ प्रवासी जखमी झाले.

याप्रकरणी हुडकेश्वर पोलिसांनी गुन्हा दाखल करीत तपास सुरू केला आहे.