आरोप -प्रत्यारोप आणि आश्वासनांच्या वर्षावानंतर आसाम, तमिळनाडू आणि केरळ या राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा प्रचार मंगळवारी सायंकाळी संपला.
आसाममध्ये १२६ जागांसाठी ७२२ उमेदवार लढणार आहेत. पुदुच्चेरीमध्ये एकूण २९४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून, ते ३० विधानसभा जागांसाठी लढणार आहेत; तर केरळमध्ये १४० जागांसाठी एकूण ८८३ उमेदवार लढत आहेत. मंगळवारी शेवटच्या दिवशी सभा, रोड शो, प्रचार फेऱ्या काढून राजकीय पक्ष ांनी शक्तिप्रदर्शन केले. राजकीय पक्ष आणि त्यांच्या उमेदवारांनी मतदारांना आकर्षित करण्यासाठी शेवटचा जोरदार प्रयत्न केला. या तिन्ही राज्यांमध्ये नऊ एप्रिल रोजी मतदान होणार आहे.

