गोपाळनगर येथील रहिवासी त्र्यंबक जानराव लवणकर (वय ८६) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर आज, बुधवारी दुपारी एक वाजता अंबाझरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात येईल. त्यांच्या पश्चात मोठा आप्तपरिवार आहे.
कांता चाचरा
फ्रेन्ड्स कॉलनी येथील रहिवासी कांता कृष्णगोपाल चाचरा यांचे निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा आज, बुधवारी सकाळी १०.३० वाजता त्यांच्या राहत्या घरून निघेल. फ्रेन्ड्स कॉलनी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात येईल. त्यांच्या पश्चात मोठा आप्तपरिवार आहे.
विलास चंदनखेडे
डोंगरगाव येथील रहिवासी तसेच आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ता विलास चंदनखेडे (वय ५८)यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर डोंगरगाव येथील घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले आणि मोठा आप्तपरिवार आहे.






