नवी दिल्ली : पश्चिम आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर ‘सनसनाटी आणि अंदाजाधारित मजकूर प्रदर्शित करणाऱ्यांच्या प्रदर्शनाला आळा घालण्याच्या उद्देशाने सरकारने टीव्ही वृत्तवाहिन्यांसाठी टेलिव्हिजन रेटिंग पॉइंट्स ( टीआरपी ) जाहीर न करण्याच्या आदेशाला चार आठवड्यांची मुदतवाढ दिली आहे.
टेलिव्हिजन रेटिंग एजन्सी ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च कौन्सिलला (बीएआरसी) माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने सहा मार्च रोजी टीव्ही वृत्तवाहिन्यांसाठी टीआरपी जाहीर न करण्याचा पहिल्यांदा आदेश जारी केला होता.






