फाल्कन्स, डेक्कन जिमखाना ‘अ’, दस्तूर या संघांनी ‘ डेक्कन-इलाईट कप ’ बास्केटबॉल स्पर्धेत आपापल्या प्रतिस्पर्ध्यावर मात केली.
डेक्कन जिमखाना बास्केटबॉल कोर्टवर ही स्पर्धा सुरू आहे. मुलींच्या गटात फाल्कन्स संघाने विद्या व्हॅली संघावर २९-११ अशी मात केली. ‘फाल्कन्स’कडून रिया बिरनाळेने सर्वाधिक ८ गुण मिळवले. यानंतर दस्तूर संघाने एबीसी संघावर ६०-५९ असा एका गुणाने रोमहर्षक विजय मिळवला. दस्तूर संघाकडून अनिका नायक (१३), एरियाना शिंदे (११) यांनी चमक दाखवली. ‘एबीसी’कडून रावी लोंढेने (२९) चांगली लढत दिली. डेक्कन जिमखाना संघाने सेंट मेरीज संघाचे आव्हान ५०-४० असे परतवून लावले. ‘डेक्कन’च्या विजयात अनुशा सोनटक्के (१५), तनरिका चक्रवर्ती (१२) यांनी चमक दाखवली, तर सेंट मेरीजकडून अदिती टंडन (१७), त्रिशा टिकू (१२) यांची लढत एकाकी ठरली.

