खड्ड्यातील पाण्यात बुडाला चिमुकला

महाराष्ट्र टाइम्स

कोंढाळीत एका दुर्दैवी घटनेत तीन वर्षांचा लाभांश कुलदीप चंदनखेडे खेळता खेळता घरासमोरील खड्ड्यातील पाण्यात बुडून मरण पावला. रविवारी सायंकाळी ही घटना घडली. नातेवाईकांनी शोध घेतला असता तो खड्ड्यात बेशुद्ध अवस्थेत आढळला. नागपूरला हलवल्यावर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेने चंदनखेडे कुटुंबाला मोठा धक्का बसला असून परिसरात शोककळा पसरली आहे. भूखंडमालक, नगरपंचायत आणि नगरसेवक जबाबदार असल्याचा आरोप वडिलांनी केला आहे.

खड्ड्यातील पाण्यात बुडाला चिमुकला
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)

खेळता खेळता घरासमोरील खड्ड्यातील पाण्यात बुडून तीनवर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी सायंकाळी कोंढाळीतील शिक्षक कॉलनी परिसरात घडली.

लाभांश कुलदीप चंदनखेडे असे मृताचे नाव आहे. त्याचे वडील कुलदीप हे खासगी काम करतात. त्यांच्या घरासमोरील मोकळ्या जागेत गेल्या तीन महिन्यांपासून खड्डा खणण्यात आला असून त्यात पाणी साचले आहे. रविवारी सायंकाळी खेळता खेळता लाभांश खड्ड्यात पडला. पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, लाभांश घरी न परतल्याने नातेवाइकांनी त्याचा शोध सुरू केला. तो खड्ड्यात बेशुद्धावस्थेत आढळला. त्याला नागपुरातील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासून लाभांशला मृत घोषित केले. याप्रकरणी कोंढाळी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे. लाभांशच्या मृत्यूचा जबर धक्का चंदनखेडे कुटुंबाला बसला आहे. परिसरात शोककळा पसरली आहे. त्याच्या मृत्यूस भूखंडमालक, नगरपंचायत व नगरसेवक जबाबदार असल्याचा आरोप कुलदीप यांनी केला असून, तशी तक्रारही पोलिसांकडे केली आहे.