वि. सा. संघावर भ्रष्टाचाराचे आरोप नेहमीत होतात. आता निवडणुकीच्या निमित्ताने लोक निरनिराळ्या प्रतिक्रिया व्यक्त करीत आहेत. लोकांच्या शंका दूर करण्यासाठी नव्या कार्यकारिणीने स्पष्टीकरण द्यावे आणि पुढील वाटचाल पारदर्शक करावी. वि. सा. संघाच्या संकुलाकरिता संस्थेचे पैसेच खर्च झालेले नाहीत. त्यामुळे, वेगवेगळ्या निधी आणि योजनांमधील आलेल्या पैशांच्या खर्चाबाबत माहिती जाहीर करावी. विदर्भाच्या साहित्य क्षेत्रातील सर्वात मोठ्या संस्थेचा चेहरा स्वच्छ आणि स्पष्ट असावा, अशी अपेक्षा करणे गैर नाही, असेमत ज्येष्ठ पत्रकार आणि साहित्यिक विनोद देशमुख यांनी व्यक्त केले.

विदर्भ साहित्य संघाचे नवे अध्यक्ष गिरीश गांधी यांनी नागरिकांना आर्थिक मदतीचे आवाहन केले आहे. मात्र, लोकांना पैसे मागण्याआधी संस्थेचा मागील दहा वर्षांच्या कारभारावर श्वेतपत्रिका जाहीर करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. नव्याने निधी गोळा करीत असताना तो कशासाठी वापरला जाणार, हे नागरिकांना कळणे आ वश्यक आहे, अशी भूमिका मांडण्यात आली आहे.
अमरावती येथील प्रदीप देशपांडे यांनी वि. सा. संघाच्या भूतकाळातील आर्थिक कारभाराचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आणला आहे. संघाचे नवनियुक्त अध्यक्ष गिरीश गांधी यांनी नागरिकांना संघासाठी आर्थिक मदत करण्याचे आवाहन केले आहे. मात्र, असे आवाहन करण्याअगोदर वि. सा. संघाची सध्याची आर्थिक स्थिती कशी आहे आणि दहा वर्षांतील आर्थिक कारभार नेमका कसा होता हे जाहीर करणारी श्वेतपत्रिका गांधी यांनी जाहीर करावी. वि. सा. संघावर सातत्याने भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत. त्यांचे शंकानिरसन करण्यासाठी श्वेतपत्रिका काढली जावी. लोकांना आर्थिक मदत मागून जो निधी उभा होणार आहे, त्याचा विनियोग कसा केला जाईल, कोणत्या कार्यक्रमांसाठी हा निधी वापरला जाईल, हेदेखील जाहीर करावे, अशी मागणी प्रदीप देशपांडे यांनी केली आहे.