११ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

राज्यातील ११ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. अल्पसंख्याक विकास विभागाच्या सचिव पदावरून हटवलेले रुचेश जयवंशी यांची महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती झाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाच्या दिवशी शैक्षणिक संस्थांना अल्पसंख्याक संस्थेचा दर्जा देणारी प्रमाणपत्रे जारी केल्याप्रकरणी ही कारवाई झाली होती. या बदल्यांमुळे प्रशासकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.

ruchesh jayvanshis appointment transfers of 11 ias officers

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाच्या दिवशी राज्यातील शैक्षणिक संस्थांना अल्पसंख्याक संस्थेचा दर्जा देणारी प्रमाणपत्रे जारी केल्याप्रकरणी अल्पसंख्याक विकास विभागाच्या सचिव पदावरून उचलबांगडी करण्यात आलेले रुचेश जयवंशी यांची नियुक्ती महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी करण्यात आली आहे. यासोबतच राज्यातील इतर ११ सनदी अधिकाऱ्यांच्याही बदल्या करण्यात आल्या आहेत.