बुलबुल यांना हटविले; तमिम इक्बालकडे सूत्रे

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष अमिनुल इस्लाम बुलबुल यांना पदावरून हटवण्यात आले आहे. टी-२० विश्वचषकादरम्यान झालेल्या गोंधळामुळे हा निर्णय घेण्यात आला. नवीन निवडणुका होईपर्यंत तदर्थ समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीचे अध्यक्षपद तमिम इक्बाल यांच्याकडे सोपवण्यात आले आहे. मुस्तफिझूर रहमानला आयपीएलमधून वगळल्याने बांगलादेशने विश्वचषकावर बहिष्कार टाकला होता.

बुलबुल यांना हटविले; तमिम इक्बालकडे सूत्रे

ढाका : बांगलादेशच्या राष्ट्रीय क्रीडा परिषदेने मंगळवारी बांगलादेश बोर्डाचे विद्यमान अध्यक्ष अमिनुल इस्लाम बुलबुल यांची पदावरून हकालपट्टी केली.

नवीन निवडणुका होईपर्यंत बोर्डाचा दैनंदिन कारभार पाहण्यासाठी तदर्थ समितीची स्थापना करण्यात आली आहे. त्या समितीचे अध्यक्ष तमिम इक्बालकडे सोपविण्यात आले आहे. टी-२० वर्ल्ड कपदरम्यान झालेल्या गोंधळामुळे बुलबुल यांना हटवण्यात आले आहे. मुस्तफिझूर रहमान याला आयपीएलमधून बाहेर काढल्याचा निषेध म्हणून बांगलादेशने वर्ल्ड कपवर बहिष्कार टाकला होता.