नवी दिल्ली : दिल्लीतील नवीन महाराष्ट्र सदनात येत्या शनिवार व रविवारी (११ व १२ एप्रिल) होणाऱ्या शासकीय महिला अधिकाऱ्यांच्या पहिल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या निमित्ताने देशभरातील महिला साहित्यिक , कवी, विचारवंत आणि सांस्कृतिक क्षेत्रातील अधिकारी एकत्र येणार आहेत. निवृत्त सनदी अधिकारी लीना मेहेंदळे या संमेलनाच्या अध्यक्ष आहेत. साहित्य, समाज आणि स्त्री-अभिव्यक्ती या विविध विषयांवर चर्चासत्रे, कवीसंमेलन आणि विशेष परिसंवाद आयोजित करण्यात येणार आहेत. ही माहिती संमेलनाच्या निमंत्रक व सदनाच्या निवासी आयुक्त आर विमला व स्वागताध्यक्ष सुप्रिया देवस्थळी यांनी मंगळवारी दिली. सरहद संस्थेचे लेशपाल जवळगे उपस्थित होते.

