शिक्षकांच्या नोटिशी तातडीने मागे घ्या!

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

शिक्षण संस्था महामंडळाने जिल्हाधिकारी कार्यालयाला शिक्षकांना बजावलेल्या नोटिसा मागे घेण्याची मागणी केली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शिक्षकांकडून अशैक्षणिक कामे करून घेण्याचा अधिकार प्रशासनाला नाही. या नोटिसांवर आक्षेप घेण्यात आला आहे. दरम्यान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त भीम जल्लोष आणि आचार्य श्री समय सागर महाराजांच्या सान्निध्यात पंचकल्याणक महामहोत्सव आयोजित करण्यात आला आहे. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचे उद्बोधन होणार आहे.

court ruling shakes teachers notice

नागपूर : बुथ लेव्हल ऑफिसरसारखी अशैक्षणिक कामे न करण्याचे ठरविल्याबद्दल जिल्हाधिकारी कार्यालयाकडून खासगी अनुदानित व विनाअनुदानित शाळांमधील शिक्षकांना ‘कारणे दाखवा’ नोटिसा बजावण् यात येत आहेत. या नोटिसांवर महाराष्ट्र राज्य शिक्षण संस् था महामंडळाने आक्षेप नोंदवला आहे. या नोटिसा मागे घेण्याची मागणी करण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार खासगी शाळांतील कर्मचाऱ्यांकडून अशैक्षणिक कामे करून घेण्याचा अधिकार प्रशासनाला नाही. उच्च न्यायालयाने संबंधित कर्मचाऱ्यांच्या इच्छेविरुद्ध त्यांच्यावर अशा प्रकारचे काम सोपवता येत नाही, तसेच काम न केल्यास त्यांच्यावर प्रशासकीय कारवाई करता येणार नाही, असे स्पष्टपणे नमूद केले आहे. असे असताना या नोटिसा बजावण् यात येत आहेत, असे महामंडळाचे सरकार्यवाह रवींद्र फडणवीस यांनी म् हटले आहे.

आज भीम जल्लोष

नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला भीम जल्लोषचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. आज, १३ एप्रिल रोजी सायंकाळी ७ ते १२ यादरम्यान संविधान चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ हा कार्यक्रम होईल. भन्ते सुरेई ससाई या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित राहतील. मध्यरात्री केक कापून जयंती साजरी केली जाईल. गेल्या दोन दशकांपासून भीमसैनिक संघपाल उपरे, ॲड. लुबेश मेश्राम व अन्य सहकाऱ्यांच्या पुढाकाराने हा उत्सव आयोजित केला जातो.

सरसंघचालकांचे उद्बोधन

नागपूर : आदिश्वर धाम, तुलसीनगर येथे ११ ते १७ एप्रिलदरम्यान आचार्य श्री समय सागर महाराजांच्या सान्निध्यात पंचकल्याणक महामहोत्सव सुरू आहे. त्याअंतर्गत आज, सोमवारी सकाळी ८ वाजता सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचे उद्बोधन होणार आहे. या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन विनय जैन, मुकेश जैन, राहुल जैन पारस जैन, सुबोध जैन, वीरा फाउंडेशन, सकल जैन समाज आदींनी केले आहे.