नागपूर : खासगी अनुदानित व अंशत: अनुदानित माध्यमिक शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचे ११ एप्रिल रोजी होणारे समायोजन रद्द करण्यात आले आहे. संस्थांनी आणि शाळांनी सादर केलेल्या माहितीच्या आधारे तात्पुरती समायोजन यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यावर ८ आणि ९ एप्रिल रोजी आक्षेप मागविण्यात आले होते. त्यानंतर, ११ एप्रिल रोजी समायोजनाची तारीख जाहीर करण्यात आली होती. मात्र, ११ एप्रिल रोजी शाळांच्या पटपडताळणीला प्रारंभ होणार असल्याने हे समायोजन रद्द करण्यात आले आहे. समायोजनासाठीची नवीन तारीख नंतर जाहीर करण्यात येईल, असे माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी कळविले आहे.


