डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीसाठी मुख्य बाजारपेठेसह शहर निळाईने सजले आहे.
साध्या कापडापासून ते सॅटिनपर्यंतचे झेंडे ३० रुपयांपासून उपलब्ध असून, मोठ्या आकाराच्या आणि विशेष बनावटीच्या झेंड्यांचे दर शंभर, दोनशे, ४८० ते एक हजार रुपयांपर्यंत आहेत. गळ्यातील उपरणे २० रुपयांना मिळत असून, फेटे ७० रुपयांपासून एक हजार रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. यंदा बाजारपेठेत निळ्या रंगाच्या ' नऊवारी साड्या ' खरेदीला महिलांची पसंती आहे.


