पोप यांचे शांततेचे आवाहन

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

पोप लुई चौदावे यांनी अमेरिका आणि इराणमधील युद्धावर चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी जागतिक नेत्यांना मध्यस्थी करून शांतता प्रस्थापित करण्याचे आवाहन केले आहे. सत्तेचा माज दाखवणे थांबवा असे ते म्हणाले. इराणी संस्कृती नष्ट करण्याचा विचार अस्वीकारार्ह असल्याचेही त्यांनी नमूद केले. जागतिक शांततेसाठी त्यांनी प्रार्थनासभेत आवाहन केले.

पोप यांचे शांततेचे आवाहन

आपणच सर्वशक्तिमान आहोत, या समजातून अमेरिका आणि इराण यांच्यात युद्ध सुरू असून जागतिक नेत्यांनी या प्रकरणी मध्यस्थी करून शांतता प्रस्थापित करावी, असे आवाहन पोप लुई चौदावे यांनी केले आहे.

अमेरिका आणि इराण यांच्यात पाकिस्तानात चर्चा सुरू असताना पोप यांनी सेंट पीटर बसिलिका येथे प्रार्थनासभा घेतली. त्यांनी प्रार्थनेदरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचा उल्लेख केला नाही. मात्र, त्यांच्या आवाहनाचा रोख ट्रम्प यांच्याकडेच होता. इराणवर आपले लष्करी वर्चस्व सिद्ध करण्याच्या अमेरिकी अध्यक्षांना अनुल्लेखाने फटकारताना पोप म्हणाले की, ‘सत्तेचा माज दर्शवणे पुरे झाला. आता युद्ध थांबवा’. अमेरिका जन्मभूमी असलेल्या पोप लिओ यांनी युद्ध सुरू झाले त्यावेळी पहिल्या काही दिवसांत सार्वजनिकरित्या या युद्धाची निर्भर्त्सना करण्याचे टाळले होते. मात्र, त्यांनी आता मौन सोडले असून ट्रम्प यांना इराणी संस्कृती नष्ट करण्याचा त्यांचा विचार अस्वीकारार्ह असल्याचे नमूद केले. शनिवारी त्यांनी बोलावलेल्या प्रार्थनासभेत जागतिक शांततेसाठी आवाहन केले.