डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची उद्या, मंगळवारी (दि. १४) जयंती साजरी होणार असल्याने जुन्या नाशिकमधून मुख्य मिरवणूक तर, नाशिकरोड आणि पाथर्डी फाटा परिसरातही मिरवणुका काढण्यात येणार आहेत. त्या मार्गांवरील वाहतूक मार्गात बदल करण्याची अधिसूचना वाहतूक उपायुक्त किरिथिका सी. एम. यांनी जारी केली आहे.
मुख्य मिरवणूक मार्ग
राजवाडा (भद्रकाली) - वाकडी बारव - महात्मा फुले मार्केट - भद्रकाली मार्केट - बादशाही कॉर्नर - गाडगे महाराज पुतळा - मेनरोड - धुमाळ पॉइंट - सांगली बँक - नेहरू गार्डन - देवी मंदिर शालिमार - शिवाजी रोड - डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा (समारोप)
पर्यायी मार्ग :
चौक मंडईकडून वाहने सारडा सर्कलमार्गे जातील. फुले मार्केट ते अमरधाम, टाळकुटेश्वर मंदिर ते पंचवटीकडे वाहने जातील.
दिंडोरी नाका, मालेगाव स्टॅण्ड, रविवार कारंजा, सांगली बँकमार्गे शालिमार, सीबीएसकडे जाणाऱ्या बसेस, अन्य वाहने दिंडोरी नाक्यावरून पेठफाटा, मखमलाबाद नाका, रामवाडी पूल, अशोकस्तंभ, मेहेर सिग्नल, सीबीएस, मोडक सिग्नल, गडकरी सिग्नलमार्गे सिडको, नाशिकरोडकडे जातील-येतील.पाथर्डी फाटा
प्रवेश बंद मार्ग :
गरवारे पॉइंट ते पाथर्डी फाटा, पाथर्डी सर्कल, कलानगर, फेम सिग्नल रस्त्यावर दोन्ही बाजूंने.
पाथर्डी गाव ते पाथर्डी फाटामार्गे डॉ. आंबेडकर पुतळ्यासमोरून अंबड-सातपूर लिंक रोडवर अवजड वाहनांना मनाई.
नम्रता पेट्रोल पंप ते पाथर्डी फाटा रस्त्यावर दोन्ही बाजूंने सर्व वाहनांना मनाई असेल. पर्यायी मार्ग :
गरवारे पॉइंटपूर्वीच्या ओव्हर ब्रिजमार्गे द्वारका, फेम सिग्नल ते द्वारका ओव्हर ब्रिजमार्गे गरवारे, पाथर्डी गाव ते सातपूर-अंबडकडे जाण्यासाठी राणेनगरकडील रस्त्यावरून मार्गस्थ. अंबडकडून येणारी वाहने पोलिस स्टेशनमार्गे महामार्गावर येतील.


