‘इराणच्या कोणत्याही ‘शीघ्र प्रहार नौका’ अमेरिकी सागरी नाकाबंदीच्या दिशेने आल्या तर त्यांना उडवून दिले जाईल’,अशी धमकी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी दिली. परिणामी होर्मुझ सामुद्रधुनीची कोंडी सुरूच राहिली.
भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी साडेसातपासून अमेरिकी नौदलाकडून होर्मुझच्या सागरी नाकाबंदीला सुरुवात झाली. अमेरिकेने इराणची बंदरे आणि किनारी भागांभोवती १५हून अधिक युद्धनौका तैनात केल्या आहेत. शिवाय एफ-३५बी लढाऊ विमाने आणि एमव्ही-२२ ऑस्प्रे हेलिकॉप्टर घिरट्या घालत आहे. तत्पूर्वी ट्रम्प यांनी ‘ट्रुथ सोशल’वरून इराणला वरीलप्रमाणे धमकी दिली. ‘इराणच्या ज्या काही मोजक्या ‘शीघ्र प्रहार नौका’ शिल्लक आहेत, त्यांना आम्ही लक्ष्य केले नव्हते, कारण त्या आमच्यासाठी मोठा धोका नव्हत्या. परंतु यापैकी कोणतीही बोट आमच्या नाकाबंदीजवळ आली तर त्यांना तत्काळ नष्ट केले जाईल, असे ट्रम्प यांनी पोस्टमध्ये नमूद केले आहे. संबंधित बातम्या...९



