सिग्नलची वेळ वाढवा

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

पुणे-मुंबई जुन्या महामार्गावरील निगडीतील टिळक चौकात वाहतूक धोकादायक बनत आहे. सिग्नलची वेळ कमी असल्याने अपघात होण्याची शक्यता आहे. चौकात रिक्षावालेही अडथळा निर्माण करतात. हिरव्या सिग्नलची वेळ वाढवल्यास वाहतूक सुरळीत होईल आणि पादचाऱ्यांनाही रस्ता ओलांडणे सोपे जाईल. यामुळे अपघात टाळता येतील.

सिग्नलची वेळ वाढवा

पुणे-मुंबई जुन्या महामार्गावर, निगडीतील टिळक चौकातील वाहतूक दिवसेंदिवस जास्तच धोकादायक होते आहे. त्याच्या अनेक कारणांपैकी सिग्नलची कमी वेळ हे महत्त्वाचे कारण आहे. या मोठ्या चौकातील हिरव्या सिग्नलची वेळ १६ सेकंदांपासून ३२ सेकंदांपर्यंत ठेवली जाते. एवढ्या कमी वेळात चौक ओलांडणे सर्वांना शक्य होत नाही. त्यामुळे सिग्नल लाल झाल्यानंतरही चालक वाहने पुढे दामटतात. चौकाच्या चारही कोपऱ्यात रिक्षावाले रस्ता अडवून उभे असतात. एखादा अपघात होण्यापूर्वीच हिरव्या सिग्नलची वेळ ७० ते ९० सेकंदांपर्यंत वाढवली, तर वाहतूक सुरळीत आणि सुरक्षित होण्यास मदत होईल; तसेच पादचाऱ्यांनाही रस्ता ओलांडणे सोयीचे होईल.

- शिवराम वैद्य