सर्वंकष स्वच्छता मोहीम

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

ठाणे महापालिकेने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त प्रभाग क्र. २१ आणि २२ मध्ये सर्वंकष स्वच्छता मोहीम राबवली. महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली रेल्वे स्थानक आणि कोर्टनाका येथील बाबासाहेबांच्या पुतळ्यांच्या परिसराची साफसफाई करण्यात आली. अनुयायांच्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर ही मोहीम महत्त्वपूर्ण ठरली. नौपाडा कोपरी आणि उथळसर प्रभाग समित्यांनी यात सहभाग घेतला.

comprehensive cleanliness campaign in thane on the occasion of dr babasaheb ambedkar jayanti

ठाणे : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेच्या वतीने सोमवारी प्रभाग क्र. २१ व प्रभाग क्र. २२ मध्ये ‘सर्वंकष स्वच्छता मोहीम ’ महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली. यावेळी रेल्वे स्थानक व कोर्टनाका येथील बाबासाहेबांच्या पुतळा परिसराची स्वच्छता मोहीम राबवण्यात आली.

ठाणे जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात अनुयायी १४ एप्रिल रोजी ठाणे शहरात बाबासाहेबांना जयंतीदिनी वंदन करण्यासाठी दरवर्षी येतात. ठाणे रेल्वे स्थानक परिसरातील व कोर्टनाका येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा येथे अनुयायांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते. या अनुषंगाने त्या ठिकाणची साफसफाई करण्याची सूचना पिंपळोलकर यांनी प्रशासनाला दिली. त्यानुसार नौपाडा कोपरी प्रभाग समितीमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ठाणे पश्चिम रेल्वे स्थानकानजीक, सिद्धार्थ नगर कोपरी, बुद्ध विहार आनंद नगर तसेच रमाई चौक अशा विविध ठिकाणी स्वच्छता मोहीम घेण्यात आली. तसेच उथळसर प्रभाग समिती अंतर्गत स्वच्छता मोहीम राबविली.