‘भाकरीची शाळा’ सुरू

महाराष्ट्र टाइम्स

मुरबाडच्या शेलारी-म्हाडस येथे 'भाकरीची शाळा' सुरू झाली. सिद्धेश लोकरे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. शिवणकला, मधमाशी पालन, बांबूपासून वस्तू बनवण्याचे प्रशिक्षण दिले गेले. नैसर्गिक शेतीही सुरू झाली. आदिवासी समाजाच्या रोजगाराचा प्रश्न सोडवणे हा मुख्य हेतू आहे. 'समृद्धीच्या वाटा' आणि 'स्नेहपरिवार' यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवला जात आहे.

the bread school begins a movement for the development of tribal communities

निसर्गाच्या सान्निध्यात आणि ढोल-ताशांच्या गजरात मुरबाड येथील शेलारी-म्हाडस येथे ' भाकरीची शाळा ' या अभिनव उपक्रमाचे उद्घाटन पार पडले. 'मिशन ३०३०' चे निर्माते सिद्धेश लोकरे यांच्या हस्ते या उद्घाटन झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रमुख स्नेहपरिवारचे अशोक वायकुळ होते.

उद्घाटनाच्या दिवशी शिवणकला प्रशिक्षण, मधमाशी पालन तसेच बांबूपासून टोपल्या व शोभेच्या वस्तू तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. यासोबतच एक एकर क्षेत्रावर नैसर्गिक शेती करत मेथी, पालक, कोथिंबीर, वांगी आणि झेंडू यांची लागवड करण्यात आली आहे. येथे गृहनिर्मित उत्पादनांचे विक्री केंद्रही सुरू करण्यात आले. ‘प्रत्यक्ष कृतीतून आदिवासी समाजाच्या रोजीरोटीचा प्रश्न सोडवणे, हा या 'भाकरीची शाळा'चा मुख्य हेतू आहे,' असे योगेंद्र बांगर यांनी सांगितले. 'समृद्धीच्या वाटा' आणि 'स्नेहपरिवार' यांच्या वतीने हा उपक्रम राबवण्यात येत आहे यावेळी विजय पनेलकर, दिलीप दलाल, डॉ. सुहास राजे, प्रा. चंद्रशेखर पाटील आदी उपस्थित होते.