शहरातील विविध जलकेंद्रांमधील विद्युत आणि स्थापत्यविषयक तातडीच्या देखभाल-दुरुस्तीच्या कामामुळे येत्या गुरुवारी (१६ एप्रिल) संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे; तसेच दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी (१७ एप्रिल) सकाळी उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख नंदकिशोर जगताप यांनी व्यक्त केली.
बुधवारी मध्यरात्री १२पासून गुरुवारी रात्री १२पर्यंत पाणीपुरवठा पूर्णपणे बंद असणार आहे.



