जव्हार : तालुक्यातील काळमांडवी धबधब्यावर शनिवारी नयन कुमार सिंग या तरुणाचा बुडून मृत्यू झाला आहे.
नयनचा मित्र चंदन यादव याने काही दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामवर काळमांडवी धबधब्याचे रील पाहिले होते. त्यानंतर ११ एप्रिल रोजी दुपारी सुमारे चारच्या सुमारास यादव व तीन मित्रांसह धबधब्यावर गेले. त्याचवेळी सिंग अचानक पाण्यात दिसेनासा झाला. त्यानंतर शोधमोहीम सुरू केली असता तो डोहात बुडालेल्या अवस्थेत आढळून आला. तो प्रतिसाद देत नसल्याने त्याला ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले.



