मुंबई : राज्यातील वैद्यकीय शिक्षण , नर्सिंग आणि आरोग्यसेवा अधिक सक्षम करण्यासाठी सशक्तीकरण प्रकल्प राबवण्यात येणार आहे. त्यासाठी जपानच्या इंटरनॅशनल को ऑपरेशन एजन्सीकडून (जायका) ३,७०८ कोटींची वित्तीय साह्यता घेण्यास सोमवारी मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली.
वैद्यकीय परिषदेत नामनिर्देशन पद्धत
मुंबई : राज्यातील वैद्यकीय व्यावसायिकांची नोंदणी व नियमन करणाऱ्या महाराष्ट्र वैद्यकीय परिषद या वैधानिक संस्थेशी निगडित अधिनियमात सुधारणा करण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
आकांक्षित कार्यक्रमात सहा जिल्ह्यांची समावेश
मुंबई : आकांक्षित जिल्हा व आकांक्षित तालुका कार्यक्रमाचा विस्तार करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत सोमवारी घेण्यात आला. त्यानुसार या कार्यक्रमात हिंगोली, जालना, पालघर, बीड, धुळे व परभणी या सहा जिल्ह्यांचा समावेश करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.
मुंबई शहरात
स्किल टेक विद्यापीठ
मुंबई : इंडियन एज्युकेशन सोसायटी या संस्थेस मुंबईत आयईएस स्किल टेक विद्यापीठ स्थापन करण्यास राज्य मंत्रिमंडळाने सोमवारी मंजुरी दिली. स्किल टेक विद्यापीठ हे वांद्रे येथे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून सुरू होईल, असे सोमवारी जाहीर करण्यात आले आहे.
‘मुख्यमंत्री पशुधन’मध्ये शेतकरी गट, वराहपालन
मुंबई : मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना घोषित करण्यात आली आहे. या योजनेत आता मुरघास संयंत्र वाटप योजनेत शेतकरी समूह गटाचा; तसेच वराह पालन व्यवसायाचाही समावेश करण्यात आला असल्याची माहिती पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली.



