लिफ्टमध्ये अडकलेल्या मुलांची सुटका

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

ठाणे शहरातील कासारवडवली भागात एका १२ मजली इमारतीत लिफ्टमध्ये तीन मुले अडकली होती. अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. लिफ्ट टेक्निशियन आणि स्थानिक रहिवाशांच्या मदतीने ९ ते १५ वयोगटातील या मुलांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. यामुळे एक मोठा अनर्थ टळला. सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला.

dramatic rescue of children trapped in elevator in thane

ठाणे : घोडबंदर रोड येथील कासारवडवली भागात १२ मजली इमारतीत लिफ्टमध्ये अडकलेल्या तीन मुलांची सुखरूप सुटका करण्यात आली. या मुलांना अग्निशमन दलाने तत्काळ लिफ्टमधून बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला.

कासारवडवली गाव परिसरात असलेल्या महापालिकेच्या या इमारतीत चौथ्या मजल्यावर लिफ्टमध्ये तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे या इमारतीतील ९ ते १५ वर्षे वयोगटातील मुले अडकली. या मुलांना अग्निशमन दलाचे जवान, लिफ्ट टेक्निशियन व स्थानिक रहिवाशांच्या मदतीने सुखरूपपणे बाहेर काढण्यात आले.