मुंबई : ‘‘टीसीएस’चे नाशिकमधील युनिट सुरू असून, ते ग्राहकांना सेवा देत आहे. हे युनिट बंद करण्यात आल्याच्या बातम्या पूर्णपणे असत्य आहे,’ असा दावा ‘टीसीएस’चे एमडी व सीईओ के. कृतीवासन यांनी प्रसिद्धीपत्रकात शुक्रवारी केला.
नाशिक प्रकल्पात अलीकडे घडलेल्या घटनांची दखल कंपनीने कशा प्रकारे घेतली आहे याची माहितीही त्यांनी दिली आहे.
निदा खान ‘टीसीएस’च्या एचआर मॅनेजर म्हणून नियुक्त नाहीत; तसेच त्यांच्याकडे नोकरभरतीची जबाबदारी आहे. त्या ‘प्रोसेस असोसिएट’म्हणून कार्यरत होत्या, असे कंपनीने सांगितले.






