पीडितेला जाणीवपूर्वक दिला कामाचा ताण

Contributed by@timesofindia.com,सौरभ बेंडाळेेsaurabh.bendale@timesofindia.com|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

एका बहुराष्ट्रीय कंपनीत महिला कर्मचाऱ्याला कामाचा अतिरिक्त ताण देऊन छळल्याचा आरोप झाला आहे. आरोपीने पीडितेच्या धार्मिक भावना दुखावल्या आणि तिला धमक्या दिल्या. या प्रकरणी टीसीएसने अंतर्गत चौकशीसाठी तज्ज्ञ संस्थांची नियुक्ती केली आहे. पीडितेच्या जबाबातून अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत. कंपनीने मात्र अशा तक्रारींची नोंद नसल्याचे म्हटले आहे.

work stress at tcs false complaint of harassment victims experience

टीसीएसने अंतर्गत चौकशीसाठी ‘डेलॉईट’ आणि ‘ट्रायलीगल’ या तज्ज्ञ संस्थांची नियुक्ती केली आहे. या प्रक्रियेवर देखरेखीसाठी केकी मिस्त्री यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली असून, आरती सुब्रमण्यम यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. निवेदनानुसार, निदा खान व्यवस्थापक नसून केवळ सामान्य कर्मचारी होत्या. प्राथमिक तपासणीत कंपनीच्या तक्रार निवारण केंद्रांकडे अशा कोणत्याही तक्रारीची नोंद आढळलेली नाही, असे कंपनीने सांगितले आहे.

नाशिक : बहुराष्ट्रीय कंपनीतील महिलांवरील अत्याचार , विनयभंगासह धार्मिक भावना दुखावणाऱ्या संशयिताला पीडितेने टाळल्याने त्याने जाणीवपूर्वक अतिरिक्त कामाचा ताण देऊन तीस सेकंदाला येणाऱ्या ‘कॉल’ऐवजी पीडित विवाहितेला प्रतिसेकंद ‘कॉल’ येण्याची ‘सेटिंग’ केली. यासह पीडितेला ‘टीम्स’वर शाब्दिक कोडे देऊन त्याची उत्तरे मागवत, हे प्रकरण गुप्त ठेवण्यासाठी दबाव आणल्याचे पीडितेच्या जबाबातून स्पष्ट झाले आहे.

आरोपी रझा याच्या वागण्यामुळे पीडिता लांब राहण्याचा प्रयत्न करीत होती. ‘मी एकटी असताना रझा जाणीवपूर्वक माझ्याकडे विचित्र नजरेने बघायचा. मला मुद्दाम स्पर्श करायचा म्हणून मी तिथून निघून जात असे. २०२३ मध्ये ट्रेनिंग मॅनेजरकडे त्याची तक्रार केली होती. त्याचा राग मनात ठेवून रझाने माझे ‘अफेअर’ असल्याचे खोटे पसरवले. नोव्हेंबर २०२५ मध्ये माझ्या लग्नाचा संदर्भ देऊन अश्लील बोलायचा. शाहरुखही एकटक पाहून अश्लील बोलायचा,’ असेही जबाबात नोंद आहे.