छत्रपती संभाजीनगर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त क्रांती संघटनेतर्फे आयोजित कार्यक्रमात भिक्खू संघाच्या वतीने संघटनेचे अध्यक्ष राहुल साळवे यांना समाजभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. भंते रत्नदीप थेरो यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
संघटनेतर्फेे दरवर्षी प्रमाणे यंदाही स्वागतमंच उभारुन विविध क्षेत्रात सामाजिक योगदान देणाऱ्यांचा गौरव करण्यात आला. भंते रत्नदीप थेरो अध्यक्षस्थानी होते. भंते फ्रांकातिको, रतनकुमार साळवे, डॉ. दौलतराव सोनवणे, डॉ. रामेश्वर राऊत, शरद सोनवणे, संदीप भदाने, सुमित पंडित, पूजा पंडित, अरुण वासनकर, कविता दाभाडे, आशा चौगुले आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.





