छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयांते महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५च्या दशकपूर्ती सोहळ्याच्या औचित्याने २८ एप्रिलला जिल्हा आणि ग्राम पातळीवर विविध जनजागृती कार्यक्रम करावेत, असे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते यांनी दिले आहेत. यामध्ये २८ एप्रिल रोजी सकाळी अकराला सर्व शासकीय कार्यालयांमध्ये अधिकारी व कर्मचाऱ्यांद्वारे सेवा देण्याबाबतची शपथ घेतली जाईल. पालकमंत्री, खासदार आणि आमदारांच्या उपस्थितीत ंउत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचा गौरव होईल. शाळा-महाविद्यालयांमध्ये विविध स्पर्धा, तसेच स्काऊट, एनसीसी आणि एनएसएसच्या विद्यार्थ्यांची फेरी निघणार असून महाराष्ट्र दिनी ग्रामसभांतून कायद्यातील तरतुदींचे वाचन होईल.
शिवगिरी महाराजांचे गुरुवारी सेलूत प्रवचन
परभणी : त्र्यंबकेश्वर येथील पंचदशनाम जुना आखाड्याचे अध्यक्ष श्री श्री १००८ महामंडलेश्वर शिवगिरी महाराजांचे प्रवचन गुरुवारी सायंकाळी पाचला सेलूतील महेशनगरातील मंदिरात होईल.





