छत्तीसगडमध्ये यूसीसीसाठी उच्चस्तरीय समिती

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
Maharashtra Times

रायपूर : छत्तीसगड सरकारने समान नागरी कायदा (यूसीसी) लागू करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलत त्यासाठी मसुदा तयार करण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. कायदे सुलभ करणे आणि धार्मिक तसेच लैंगिक समता प्रस्थापित करणे हा यामागील उद्देश असल्याचे अधिकृत निवेदनात नमूद करण्यात आले. मुख्यमंत्री विष्णू देव साय यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालय महानदी भवन येथे झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या समितीच्या अध्यक्षपदी निवृत्त न्यायाधीश रंजना प्रकाश देसाई यांची नियुक्ती केली असून इतर सदस्यांच्या नियुक्तीचा अधिकार मुख्यमंत्र्यांना आहे. ज्यात विवाह, घटस्फोट, वारसा, दत्तक, पालनपोषण आणि कौटुंबिक वाद यांसारख्या बाबी विविध धर्मांनुसार वेगवेगळ्या यद्यांद्वारे नियंत्रित केल्या जातात.