चिकलठाणा येथील श्री संत गोरोबा काका मंदिर परिसरात सभामंडपाच्या बांधकामाचे भूमिपूजन आमदार अनुराधा चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. बुधवारी (१५ एप्रिल) झालेल्या भूमिपूजन कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य कुंभार समाजाचे संजय जोर्ले यांच्यासह सह कुंभार समाजाच्या प्रतिष्ठीत नागरिक; तसेच नगरसेवकांची यावेळी उपस्थिती होती.
श्री संत गोरोबा काका यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त सभामंडपाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या वेळी महाराष्ट्र राज्य कुंभार समाजाचे उमाजी सुर्यवंशी, प्रमोद जाधव सह मंडळाची कार्यकारणी अध्यक्ष मनोहरजी तांगडे, किशोर दिवटे, उपाध्यक्ष मुरलीधर तिडके ,सचिव गणेश नारायण कर,सदस्य राम जाधव, गणेशजी देवरे सह अन्य मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी आमदार अनुराधा चव्हाण यांनी सभामंडपाचे काम लवकरात लवकर पुर्ण करून मंदिरात येणाऱ्या भाविकांना अधिक सुविधा देण्याचे काम आगामी काळातही केले जाईल. असा विश्वास व्यक्त केला.
या वेळी महाराष्ट्र राज्य कुंभार समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी राज्यभरातील कुंभार समाजाच्या विकासासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्याची मागणी अनुराधा चव्हाण यांच्याकडे केली. या वेळी भावगितांच्या कार्यक्रमासह महाप्रसादराचे कार्यक्रमही ठेवण्यात आले.
गेल्या वर्षी आमदार अनुराधा चव्हाण यांनी मंदिर परिसरात सभामंडपाचे बांधकाम करण्यासाठी विस लाख रुपये देण्याचे मान्य केले हेाते. आमदार अनुराधा चव्हाण आणि अतुल चव्हाण यांनी दिलेल्या वचनाची पूर्तता करून आमदार निधीतून वीस लाख रुपयांची सभामंडपासाठी तरतूद केली.







