ड्रग्जसाठी व्हॉटसॲप, स्नॅपचॅट

महाराष्ट्र टाइम्स

गोरेगाव नेस्को सेंटरमधील ड्रग्ज मृत्यू प्रकरणात व्हॉटसॲप आणि स्नॅपचॅटचा वापर समोर आला आहे. क्यूआर कोडद्वारे पैशांचे व्यवहार झाले. पोलिसांनी विनीत गेरेलानीला अटक केली असून एकूण आरोपींची संख्या सात झाली आहे. या प्रकरणात आणखी दोघांचा शोध सुरू आहे. ११ एप्रिल रोजी झालेल्या संगीत रजनी कार्यक्रमात दोन विद्यार्थ्यांचा ड्रग्ज ओव्हरडोसने मृत्यू झाला होता.

whatsapp and snapchat used for drugs death of two students at goregaon concert

गोरेगाव नेस्को सेंटरमधील ड्रग्ज मृत्यूप्रकरणातील तपासात नवनवीन माहिती उघड होत आहे. ड्रग्जची देवाणघेवाण, तसेच पैशांच्या व्यवहारांसाठी व्हॉटसॲप , स्नॅपचॅटचा वापर केल्याचे समोर आले आहे. क्यूआर कोड पाठवून ड्रग्जचे पैसे ऑनलाइन स्वीकारण्यात आले, असे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी गुरुवारी विनीत गेरेलानी (२२) याला अटक केली. विनीत हा बीकॉमचा विद्यार्थी असून एकूण अटक आरोपींची संख्या सातवर पोहोचली आहे.

या सर्व आरोपींना न्यायालयाने १८ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. या प्रकरणात आणखी दोन आरोपींवर पोलिसांची नजर आहे. गोरेगाव नेस्को सेंटरमध्ये ११ एप्रिल रोजी नेस्को आणि इन्स्पायरिंग टाय प्रोडक्शन यांच्या वतीने ‘९९९९९९९९९- टेक्नो इव्हेण्ट’ या संगीत रजनी कार्यक्रमाचे (लाइव्ह म्युझिक कॉन्सर्ट) आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ड्रग्जचा ओव्हरडोस झाल्याने बिस्मातसिंह भसीन आणि श्रेया राय या एमबीएच्या दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी वनराई पोलिस ठाण्यात सदोष मनुष्यवध, अमली पदार्थ प्रतिबंधक कायदा, तसेच इतर वेगवेगळ्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करून पोलिसांनी विहान उर्फ आकाश समळ, (पान ६वर)