देशातील महत्त्वाच्या संस्थांपैकी एक असलेल्या ‘दि एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबई’च्या निवडणुकीवरून गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या वादावर आज, शुक्रवारी पडदा पडण्याची शक्यता आहे. ‘निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया नव्याने राबवावी, अशी सूचना मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी केली. तसेच शुक्रवारी योग्य तो आदेश देण्याचे संकेत न्या. फरहान दुबाश यांनी दिले.
‘नव्या सदस्यांच्या अर्जांची छाननी धर्मादाय आयुक्तांनी नेमलेल्या समितीकडून झाल्यानंतर उमेदवारी अर्जही नव्याने भरण्यात यावेत. त्याअनुषंगाने प्रस्तावित कृती कार्यक्रम मांडावा,’ अशा सूचनाही न्यायालयाने केल्या.
यापूर्वी ८ नोव्हेंबर २०२५ रोजी निवडणूक नियोजित असताना ३ ऑक्टोबरचीच सदस्यत्व यादी ग्राह्य धरण्याचा आदेश (पान ६वर)







