स्नॅपचॅटद्वारे विनीतने ड्रग्जचे व्यवहार केल्याचे तपासातून समोर आले आहे. ड्रग्जचे पैसे स्वीकारण्यासाठी स्नॅपचॅटवरूनच क्यूआर कोड पाठविण्यात आले. अमली पदार्थ विकून आलेले पैसे त्याच्या खात्यावर आले. त्याने नंतर या गुन्ह्यात हव्या असलेल्या अन्य एका आरोपीला ते पाठविल्याचे पोलिसांनी सांगितले. ड्रग्जची खरेदी-विक्रीच नाही, तर विनीत स्वतःही ११ एप्रिल रोजी झालेल्या म्युझिक कॉन्सर्टमध्ये उपस्थित होता, असेही निष्पन्न झाले आहे.








