‘नारीशक्ती वंदन’ला प्रतिसाद

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

परभणीत 'नारीशक्ती वंदन'ला प्रतिसाद देत सेलू येथे जनजागृती कार्यक्रम झाला. महिला सक्षमीकरणावर भर देण्यात आला. आरोग्य आणि मासिक पाळीविषयी मार्गदर्शन करण्यात आले. महिलांनी लोकसभा व विधानसभेत ३३ टक्के आरक्षणाच्या निर्णयाला पाठिंबा दिला. या उपक्रमात अनेक महिला पदाधिकारी सहभागी झाल्या होत्या.

‘नारीशक्ती वंदन’ला प्रतिसाद

परभणी : दीपस्तंभ प्रतिष्ठान व आर निसर्ग फाउंडेशन यांच्या वतीने ‘नारीशक्ती वंदन अधिनियम : सक्षम नारी, सशक्त भारत’ या विषयावर सेलू येथे भव्य जनजागृती कार्यक्रम उत्साहात पार पडला. पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली १६ एप्रिल रोजी हा आरोग्यविषयक जनजागृती उपक्रम आयोजित करण्यात आला होता.

संयोजिका इशिता मेघना दीपक साकोरे यांनी प्रास्ताविकातून महिलांच्या सक्षमीकरणासाठी उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित केले. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या सदस्या डॉ. सविता रोडगे होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून नारीशक्ती वंदनच्या प्रवक्ता सुनंदा आनंदगावकर, आरोग्य व स्वच्छता मार्गदर्शक राधिका काबरा व पूजा संतोष ढोणे उपस्थित होत्या.

कार्यक्रमात महिला प्रदेश उपाध्यक्ष प्रणिता चिखलीकर, भाजप महिला ग्रामीण जिल्हाध्यक्ष सारिका पारवे, जिल्हा परिषदेच्या सदस्या योगिता मोरे, प्रीती डख व आर निसर्ग प्रतिनिधी गीतांजली कानडकर यांनी महिलांशी संवाद साधून आरोग्यविषयक मार्गदर्शन केले. आर निसर्ग फाउंडेशनच्या डॉ. विना अंगाडी व त्यांच्या सहकाऱ्यांनी महिलांना मासिक पाळीसंदर्भात सविस्तर प्रशिक्षण देऊन जनजागृती केली.

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी भाजपा महिला मोर्चाच्या पदाधिकारी ज्योती मोगल, संध्या चिटणीस, रूपा ठाकूर, बबिता ठाकूर, वनिता चाफेकर, अश्विनी पवार, प्रियंका बोंबले, अनिता महाजन, मंजूषा शेलगावकर, शेख रुबीना यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले. या वेळी लोकसभा व विधानसभेत महिलांना ३३ टक्के आरक्षण लागू करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला पाठिंबा देण्यासाठी उपस्थित महिलांनी ९६६७१७३३३३ या क्रमांकावर ‘मिस्ड कॉल’ देऊन आपला सहभाग नोंदवला.