खड्ड्यामुळे दुचाकी घसरली

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

छत्रपती संभाजीनगर-जळगाव राष्ट्रीय महामार्गावर फरशी फाटा येथे खड्ड्यामुळे दुचाकी घसरून एक युवक गंभीर जखमी झाला. ज्ञानेश्वर शेषराव वाघमोडे हे जळगावहून छत्रपती संभाजीनगरकडे येत असताना हा अपघात घडला. नागरिकांनी आणि संस्थानच्या रुग्णवाहिकेने तातडीने मदत केली. जखमी युवकाला फुलंब्री येथील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती स्थिर आहे.

yuva gets seriously injured in bike accident on jalgaon road

फुलंब्री : छत्रपती संभाजीनगर-जळगाव राष्ट्रीय महामार्गावर फरशी फाटा येथे खड्डा चुकवताना दुचाकी घसरून झालेल्या अपघातात एक युवक गंभीर जखमी झाला. हा अपघात शनिवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास घडला.

जखमी युवक ज्ञानेश्वर शेषराव वाघमोडे (वय २७, रा. चिचवन, ता. सिल्लोड, जि. छत्रपती संभाजीनगर) हे दुचाकीने क्रमांक (एमएच २० एचपी ५९२९) जळगावहून छत्रपती संभाजीनगरकडे येत होते. फरशी फाट्याजवळील रस्त्यावर असलेल्या खड्ड्याचा अंदाज न आल्याने त्यांच्या दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि दुचाकी घसरून अपघात झाला.

यात वाघमोडे गंभीर जखमी झाले. अपघातानंतर घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी तत्काळ मदतकार्य सुरू केले. याच वेळी पाल फाटा पॉइंटवर उभी असलेली जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी श्री क्षेत्र नाणीजधाम संस्थानची रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचली.

रुग्णवाहिकेचे चालक अमोल बनकर यांनी तत्परता दाखवून त्यांना तातडीने फुलंब्री येथील घाटी रुग्णालयात दाखल केले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे.