सुरेश पवारयांचे निधन

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

लातूरचे माजी महापौर सुरेश पवार यांचे निधन झाले. रविवारी सकाळी पुण्यात हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचे निधन झाले. सायंकाळी लातूर येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पवार हे सहा वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करून महापौरपद भूषवले होते. सहा महिन्यांपूर्वी त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यांच्या पश्चात दोन मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे.

सुरेश पवारयांचे निधन

लातूर : माजी महापौर सुरेश पवार यांचे रविवारी सकाळी पुण्यात हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. सायंकाळी त्यांच्या पार्थिवावर लातूर येथे मारवाडी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. पवार हे सहा वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. त्यांनी पाच वर्षांपूर्वी भाजपामध्ये प्रवेश करून भाजपचा पहिला महापौर होण्याचा मान मिळवला होता. अत्यंत मनमिळाऊ स्वभावाचे, नगरपालिका कामकाजाची माहिती असलेले नगरसेवक अशी त्यांची ओळख होती. सहा महिन्यांपूर्वी त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यांच्या पश्चात दोन विवाहित मुली, एक मुलगा असा परिवार आहे.