‘नगरसेविकांचा वाद मिटला’

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

पुण्यातील भाजपच्या दोन नगरसेविकांमधील वाद अखेर मिटला आहे. सभागृह नेते गणेश बीडकर यांनी हा वाद गैरसमजातून झाल्याचे स्पष्ट केले. विकासकामातील टक्केवारीचा मुद्दा नसल्याचे त्यांनी सांगितले. बाणेर येथील आदिवासी विद्यार्थिनींसाठीच्या निवासी शिक्षण केंद्राच्या कामावरून हा वाद झाला होता. प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात असून निविदा प्रक्रिया सुरू आहे.

bjp councilors dispute resolved development work in discussion

पुणे : शहरातील राजकीय वर्तुळात चर्चेत असलेला भाजपच्या दोन नगरसेविकांमधील वाद अखेर मिटल्याचे स्पष्ट झाले आहे. भारतीय जनता पक्षाच्या आजी आणि माजी नगरसेविकांमध्ये झालेला हा वाद गैरसमजातून घडल्याचा दावा सभागृह नेते गणेश बीडकर यांनी केला आहे.

भाजपच्या आजी-माजी नगरसेविका यांच्यात जोरदार वाद झाला होता. या वादाचे व्हिडिओ व्हायरल झाल्याने पक्षांतर्गत मतभेद उघड झाल्याची चर्चा रंगली होती. या वादामागे विकासकामांतील ‘टक्केवारी’चा मुद्दा असल्याचा आरोप होत होता. बीडकर यांनी तो फेटाळून लावला. ‘हा वाद आर्थिक कारणांमुळे नव्हता. संबंधित दोघी एकमेकींना ओळखत नसल्याने तिऱ्हाईताने गैरसमज निर्माण केला. व्हायरल व्हिडिओची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली. दरम्यान, बाणेर येथे आदिवासी विद्यार्थिनींसाठी उभारण्यात येणाऱ्या निवासी शिक्षण केंद्राच्या कामावरून हा वाद झाला आहे. या प्रकल्पाचे ८५ ते ९० टक्के काम पूर्ण झाले असून, उर्वरित कामासाठी सुमारे तीन कोटी रूपयांची निविदा प्रक्रिया राबविण्यात आली आहे.